ताजी बातमी - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारांनीही कठोर निर्बंध लावण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाही उत्पादनाच्या ५० टक्के लसींची विक्री खुल्या बाजारात करता येणार आहे.
या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपल्या कोविशिल्ड या लसीचे दर निश्चित केले आहेत.
भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपल्या कोविशिल्ड लसीचे दर निश्चित केले आहेत. राज्य सरकारांना सीरम ही लस ४०० रूपये प्रति डोसच्या हिशोबानं तर खासगी रुग्णालयांना सीरम ही लस ६०० रूपये प्रति डोसच्या हिशोबानं देणार आहे.