चंद्रपूर - जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याबाबतीत योग्य उपचार मिळावा, प्रशासनाने तात्काळ 500 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारावे यासाठी कांग्रेसचे माजी शहर अध्यक्ष मनपा नगरसेवक नंदू नागरकर यांनी राहत्या घरी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले.
आज त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा पहिला दिवस, कोरोनाच्या भीषण काळात जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे अस्तव्यस्त झाली असताना जिल्ह्यातील जनप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
जिल्ह्यातील पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार धानोरकर, माजी अर्थमंत्री मुनगंटीवार असे दिग्गज असताना सुद्धा चंद्रपूर करांवर अशी वेळ येणं म्हणजे थट्टाच आहे.
ही वेळ राजकारण करण्याची नसून सर्व जनप्रतिनिधी यांनी एकत्र येत नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे.
चंद्रपूर मनपा तर निविदा काढण्यात व्यस्त आहे, मात्र नागरिक आज मृत्युमुखी पडत असतांना जनतेला वाऱ्यावर सोडण्याच काम प्रशासनाने केले असून यावर तात्काळ तोडगा काढीत 500 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारून जनतेला सहकार्य करावे अन्यथा जोपर्यंत माझ्यात जीव आहे तोपर्यंत माझं अन्नत्याग आंदोलन असेच सुरू राहील.
असा इशारा नगरसेवक नंदू नागरकर यांनी प्रशासनाला दिला.