चंद्रपूर - शहरातील बालाजी वॉर्ड परिसरात राहणाऱ्या मंजुषा अरविंद रागीट यांच्या पतीला डोळ्यांच्या त्रास असल्याने त्यांना दवाखान्यात तपासणीसाठी 3 एप्रिलला सकाळी नेले असता अज्ञातांनी घरात प्रवेश करीत घरातील आलमारी फोडून त्यामधील सोन्याचे दागिने व रोख 40 हजार रुपये लंपास केले.
या प्रकरणाची फिर्यादी रागीट यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता पोलिसांनी तपासचक्रे फिरवली, तपासात पोलिसांना फिर्यादीचा पुतण्या 20 वर्षीय अक्षय वैरागडे यावर संशय घेत ताब्यात घेतले, पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने ही घरफोडी केली असल्याची कबुली दिली.
या गुन्ह्यात अक्षय सोबत 20 वर्षीय राजा सुखदेवे, 21 वर्षीय मानव आमटे, 19 वर्षीय अनिकेत मांढरे यांचा सहभाग असल्याची कबुली दिली शहर पोलिसांनी उर्वरित 3 आरोपींना ताब्यात घेतले.
4 पैकी 3 आरोपीनी काही दिवसांपूर्वी लक्ष्मीनगर, वडगाव येथील एका कार्यालयात चोरी केली असल्याची सुद्धा कबुली दिली.
ताब्यात असलेल्या आरोपींकडून 1 लाख 36 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघमारे, विजय कोरडे, दौलत चालखुरे, बाबा डोमकावले व पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
