वरोरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने द्वारे शिवजयंती साजरी
वरोरा :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत,हिंदूंचा स्वाभिमान जगविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती तिथी प्रमाणे वरोरा येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने तर्फे साजरी करण्यात आली.
वरोरा शहर व तालुक्यातील समस्त जनतेला तसेच मनसे , मनविसे , पदाधिकारी व सर्व मनसैनिकांना आमंत्रित करण्यात आले होते.
आज दिनांक ३१ मार्च २०२१ रोज बुधवारला शिवजयंती उत्सव (तिथीप्रमाणे) साय. ठीक ०६.०० वाजता विश्वकर्मा चौक, कर्मवीर वॉर्ड,वरोरा येथें आयोजित करण्यात आली , छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देवून त्यांच्या प्रतिमेची माल्यार्पण करून पूजा करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची महती पदाधिकारी यांनी आपल्या विचारातून प्रगट केली . या कार्यक्रमाच्या औचित्याने कर्मवीर वॉर्डातील विश्वकर्मा चौक येथे मसाला भात वाटप करण्यात आला .
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात गौरव मेले ,सुरेश डोंगरे , अजय अंड्रस्कर, शरद पुरी, हर्षल डोंगरे, अनिकेत पुरी, अनिकेत तुराले, आकाश रंदळे, अनिकेत श्रिरंग, रोहित मोलगुरी, शिवम पेंदोर, सुरज गेडाम, आर्दश हांडे, अक्षय डाहुले,हर्षल भोयरकर, गौरव कायरकर, संस्कार कोरेकार, गणेश ठेंगणे, कुंदन मेश्राम, धिरज गायकवाड, जयराम नैताम, चेतन मेश्राम, श्रिकांत जिवतोडे, यश देडगे, चेतन कडूकर, वैभव बोंडे, स्वरूप सपाट इत्यादी मनसैनिकाचे सहकार्य केले.
शिवसेना तर्फे घुग्गुस येथे शिवजयंती उत्साहात साजरी
(घुग्गुस )येथील शिवसेना व छत्रपति शिवाजी महाराज उत्सव कमेटीच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीथी नुसार गांधी चौक येथे घुगुस शिवसेना शहर प्रमुख बंटी घोरपडे , युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे , प्रभारी शहर प्रमुख सतिश बोंडे,यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला अभिवादन केले.
यावेळी उपशहर प्रमुख योगेश भांदककर,शिवसेना नेते प्रभाकर चिकनकर, जयस्वाल,रघुनाथ धोंगळे, बाळु चिकनकर, अजय जोगी,गणेश शेंडे,सतिश गोहकार, युवासेना चेतन बोबडे , महिला आघाडी शहर प्रमुख संध्या ताई जगताप तसेच शिवसैनिक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते ठाणेदार गांगुर्डे यांनी गांधी चौक येथे पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.
शिवसेनेच्या वतीने "शिवाजी महाराज" जयंती साजरी.
गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथे शिवसेनेच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.स्थानिक शिवाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी गडचांदूर न.प. शिवसेना गटनेते तथा नगरसेवक सागर ठाकूरवार,नगरसेवक शेख सरवर, नगरसेविका सौ.किरण अहिरकर, नगरसेविका सौ.वैशाली गोरे,नगरसेविका सौ.सुनीता कोडापे,शहरप्रमुख अक्षय गोरे,युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रणित अहिरकर,यश ठाकूरवार,सुभाष नरेंदुलवार, दर्शन कोडापे,रोशन बोचरे यांच्यासह शिवसेना,युवासेना,महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


