भद्रावती - जमिनीचे फेरफार करण्यासाठी तहसील कार्यालय भद्रावती येथील मंडळ अधिकारी 51 वर्षीय प्रशांत बैस यांनी तक्रारदाराला 2 हजार रुपयांची लाच मागितल्याने मंडळ अधिकारी यांना चंद्रपूर लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली.
चंदनखेडा मौजा चरुर घारापुरी येथील सर्व्हे क्रमांक 129/2 मधील 1 हेक्टर 62 आर जमिनीचे फेरफार करून देण्याचा कामासाठी तक्रारदाराला 2 हजार रुपये लाच मागितली मात्र तक्रारदाराला पैसे देण्याची इच्छा नसल्याने याबाबत त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.
तक्रारीची पडताळणी केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत 1 एप्रिलला तहसील कार्यालय भद्रावती येथे प्रशांत बैस यांना 1 हजार 500 रुपये घेताना रंगेहात अटक केली.
सदर कारवाई पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे, पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे, चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातील कर्मचारी यांनी यशस्वीपणे पार पाडली.
