नागभीड - नागभीड शहरातील वार्ड क्रमांक 5 मधील 22 वर्षीय युवक अविनाश अरुण शेडमाके याने शेतातील झाडावर गळफास घेत आत्महत्या केली.
गुरुवारी दुपारच्या सुमारास अविनाश चा मृतदेह झाडाला लटकताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
आत्महत्येचं नेमकं कारण काय हे अजूनही अस्पष्ट आहे, नागभीड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद मडामे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.
