गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक असल्याचे चित्र असून या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने "विकेंड लॉकडाऊन" ची घोषणा केली.शनीवार व रविवारी आठवड्यातील दोन दिवस शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सुट देण्यात आली आहे.
मात्र कोरोनाच्या लढ्यात शासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने गडचांदूर येथील किराणा व्यापारी असोसिएशनतर्फे संपूर्ण व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने किराणा दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि १० व ११ एप्रिल रोजी विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील संपूर्ण किराणा दुकाने बंद होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सदर निर्णय घेतल्याची माहिती किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत गोरशेट्टवार यांनी दिली आहे.यावेळी नामदेवराव येरणे,विट्ठल वैद्य,मनोज भोजेकर,गजानन पोतनूरवार,सुभाष पोतनुरवार,दीपक नाहार,विवेक येरणे,दत्ता शेरे,महेंद्रर सिंग, सुकेश पोतनूरवार इत्यादींची उपस्थिती होती.
