चंद्रपूर - राज्यात भाजपला रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व कांग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी तयार करीत सत्ता मिळविली, मात्र आता या आघाडीत चंद्रपूर जिल्ह्यात बिघाडी बघायला मिळत असुन घटक पक्षातील पदाधिकारी चांगलेच नाराज झाले आहे.
राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा, गृहमंत्री राष्ट्रवादी कांग्रेसचा तर अन्य महत्वाचे पद कांग्रेसकडे आहे, चंद्रपूर जिल्ह्यात पालकमंत्री कांग्रेसचे विजय वडेट्टीवार आहे, मात्र ते घटकपक्षांना योग्य वागणूक देत नसल्याचा आरोप घटकपक्षांनी केला आहे.
3 ते 6 एप्रिलला पालकमंत्री वडेट्टीवार हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, 6 एप्रिलला महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती, यासंदर्भात शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेसच्या पदाधिकारी यांना मेल व व्हाट्सएपच्या माध्यमातून पीडीएफ फाईल पाठविण्यात आली होती.
मात्र बैठक सुरू कधी होणार याबाबत कुणालाही कळविण्यात आले नाही, यामुळे त्या बैठकीत घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित राहिले नाही.
याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पालकमंत्री वडेट्टीवार हे महाविकास आघाडीला महत्व देत नाही, ज्या पक्षांनी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केली त्यांना ते विचारत सुद्धा नाही, मागच्या वेळी अशी वागणूक दिल्याने आम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिला होता, राजीनामा का दिला? त्यामागचे कारण काय? यावर आम्हाला पालकमंत्री वडेट्टीवार यांचेकडून साधी विचारणा सुद्धा करण्यात आली नाही.
पालकमंत्री वडेट्टीवार हे महाविकास आघाडीची बैठक कागदोपत्रीचं घेतात की काय? कारण आम्हाला बैठकीच्या नियोजित वेळा सुद्धा सांगण्यात येत नाही.
राष्ट्रवादी कांग्रेसचे महानगर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी सुद्धा आपली नाराजी याबाबत व्यक्त केली आहे.
पालकमंत्री वडेट्टीवार हे कांग्रेसचे नसून महाविकास आघाडीचे मंत्री आहे त्यांना फक्त कांग्रेस कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी वेळ आहे, चंद्रपुरात अनेक समस्या आहे, अनेक नागरिक आम्हाला त्या समस्या सांगतात, शासकीय पध्द्तीने त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कधी संपर्क साधला तरी त्यांना वाव मिळत नाही, मग आम्हाला महाविकास आघाडीची बैठक घेत असल्याचे दूरध्वनी द्वारे सांगणं सुद्धा यांना उचित वाटत नसेल तर बैठकीचे आयोजन कशाला? असा प्रश्न कक्कड यांनी यावेळी उपस्थित केला.
महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहे, राज्यातील समस्या सोडविण्यासाठी तिन्ही पक्षांनी सोबत येत काम केलं पाहिजे असा दुजाभाव मंत्र्यांकडून अपेक्षित नाही.
जिल्ह्यात अनेक समस्या आहे, त्या समस्या राष्ट्रवादी किंवा शिवसेनेमार्फत नागरिक मांडतात मात्र त्या सोडविण्यासाठी पक्षश्रेष्ठींनाचं पाचारण करावं लागतं असेल तर महाविकास आघाडीचे महत्व काय असेल? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
