वरोरा - दि 23/04/21 रोजी पो. स्टे. वरोरा हद्दीतील पारधी टोला (येवती) येथिल जंगल परिसरात दारूबंदी रेड केली असता आरोपी अनिल नीलकंठ मालवे, निलेश नीलकंठ मालवे यांचे ताब्यात मोहदारू, मोहसडवा , मोहदारू भट्टी साहित्य असा एकूण 3, 05,300 रु. चा माल, आरोपी दिनेश विठ्ठल पवार यांचे ताब्यात मोहदारू, मोहसडवा, मोहदारू भट्टी साहित्य असा एकूण 2,02,200 रु चा माल, आरोपी विठ्ठल हरीलाल पवार यांचे ताब्यात मोहदारू, मोहसडवा , मोहदारू भट्टी साहित्य असा एकूण 1,36,800 रु चा माल, आरोपी चंद्रभान मनोहर भोसरे यांचे ताब्यात मोहसडवा, मोहदारू भट्टी साहित्य असा एकूण 46,900 रु चा माल, आरोपी सुनील जयचंद पवार याचे ताब्यात मोहसडवा, मोहदारू भट्टी साहित्य असा एकूण 48,800 रु चा माल असे 6 आरोपी व एकूण कि. 7,40,000 रु. चा मोहदारूचा मुद्देमाल मिळून आल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाही मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री. अरविंद साळवे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे , मा. उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा श्री. निलेश पांडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वरोरा श्री दिपक खोब्रागडे यांचे अधिपत्यात पोउपनी सर्वेस बेलसरे, सफो विलास बलकी, पोहवा राजेश वऱ्हाडे, रणधीर मेश्राम, नापोशी किशोर बोढे, दिलीप सूर, अमोल ननावरे, पोशी कपिल भांडारवार , दिनेश मेश्राम, विशाल गिमेकर, सुरज मेश्राम, महेश बोलगोडवार व महिला सैनिक पूजा, पायल यांनी पार पाडली.