घुग्गुस - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून सध्या नागरिकांना बेड उपलब्ध होत नसून यावर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे, मात्र जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार या उपाययोजना करण्यात कमी पडले आहे.
मात्र माजी खासदार हंसराज अहिर या कोरोना महामारीत सुद्धा नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी प्रयत्न करीत आहे, त्यांच्या प्रयत्नाचे फलित म्हणजे वेकोलीचे सीएमडी मनोजकुमार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वेकोली चे रुग्णालय कोविड सेंटर मध्ये रूपांतरित झाले आहे.
घुग्गुस येथील राजीव रतन रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी 56 बेडच्या कोविड सेंटरची सुरुवात झाली असून सध्या 24 बेड कार्यरत झाले आहे, उर्वरित बेड 2 दिवसात सुरू होणार आहे.
वेकोलीने जिल्ह्यातील स्वतःचे रुग्णालय हे वेकोली कर्मचारी यांचेसाठी अत्याधुनिक कोविड सेंटर उभारल आहे, लवकरच चंद्रपुरात लिक्विड ऑक्सिजन प्लांट सुद्धा सुरू होणार अशी माहिती अहिर यांनी यावेळी दिली. राजीव रतन हॉस्पिटल कोविड सेंटर मध्ये माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी कोरोना लसीचा दुसरा डोज घेतला.
वेकोली कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना कोविड पासून सुरक्षा करण्यासाठी हे रुग्णालय संजीवनी ठरणार असे वक्तव्य वेकोलीचे महाप्रबंधक उदय कावळे यांनी यावेळी केले.
कोविड रुग्णांची सेवा करणाऱ्या वैधकीय कर्मचाऱ्यांना अहिर यांनी सुरक्षा किटचे वाटप केले.
यावेळी वेकोलीचे महाप्रबंधक उदय कावळे, एस.जी. वैरागडे, डॉ. आनंद, सुजित पिसारोडी, डॉ. शंभरकर, विजय राऊत, मधुसूदन रुंगठा, हरी अहिर, संजय तिवारी, निरीक्षण तांड्रा यांची उपस्थिती होती.
