चंद्रपूर - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा काहीजण चांगला लाभ घेत आहे, कोरोना रुग्ण व त्याचे कुटुंब आज बेड व ऑक्सिजन साठी हॉस्पिटलसमोर वाट बघत आहे.
अनेकांचा हॉस्पिटलसमोर मृत्यू सुद्धा झाला आहे, प्रशासन यावर ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरला आहे.
रुग्णांची होत असलेली हेळसांड व या कोरोनाचा फायदा घेणारे राक्षस कोविड रुग्णांच्या जीवावर उठले आहे.
चंद्रपूर शहरात दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी खाजगी एम्ब्युलन्स चालक 5 ते 10 हजार रुपये आकारत आहे, मात्र यावेळी आपल्या कुटुंबातील सदस्यांना वाचविण्यासाठी ह्या लुटमारी चे बळी पडत आहे.
चंद्रपुर वरून
दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एम्ब्युलन्स चालक 30 ते 50 हजार, बाहेर राज्यात जाण्यासाठी तब्बल 75 हजार ते 1 लाख रुपये कोविड रुग्णाच्या परिवाराकडून घेत आहे.
प्रशासन तर या लुटमारीवर गप्प आहे मात्र चंद्रपूर शहरातील काहींनी कोविड रुग्णांसाठी मोफत सेवा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे.
माणुसकी दाखविणारे मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, सामाजिक कार्यकर्ते रक्तदूत हकीम हुसेन यांनी ही सेवा सुरू केली आहे.
राहुल बालमवार यांनी आपले स्वतःचे चारचाकी वाहन हे कोविड रुग्णांना ने-आण करण्यासाठी नागरिकांच्या सेवेत दाखल केले आहे.
रक्तदूत हकीम हुसैन यांनी कोविड लक्षण नसलेले नागरिक यांना त्यांच्या घरी पोहचविण्यासाठी सुरू केले असून अनेक नागरिकांनी या दोन सामाजिक कार्य करणाऱ्या युवकांच्या उपक्रमाला साथ दिली.