चंद्रपूर - कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020अंतर्गत कृषिपंपधारकांना वीजबिलात सवलत देण्याच्या योजनेतून चंद्रपूर परिमंडलातील –चंद्रपूर व गडचिरेाली जिल्हयाचा समावेश असणारया चंद्रपूर, वरोरा,बल्लारशा , ब्रम्हपुरी, गडरिोली व आलापल्ली विभागातील एकंदरीत 27 हजार 348 कृषिपंप ग्राहकांनी 22 कोटी 82 लाख रुपयांचा भरणा केला. यात चंद्रपूर जिल्हयातील 20 हजार 80 ग्राहकांनी 16 कोटी 54 लाख तर गडचिरोली जिल्हयातील 7हजार 262 ग्राहकांनी 6कोटी 28 लाख रुपयांचा भरणा करुन थकबाकी मुक्तिची वाट धरली.
या योजनेच्या वैशिष्ठयानुसार म्हणजे चंद्रपूर जिल्हयातील कृषिपंपधारकांकडून भरल्या गेलेल्या 16 कोटी 54 लाख या वीजबिलाच्या कोटी लाखाच्या रक्कमेतून 33 टक्के म्हणजे 5 कोटी 42 लाख हे कृषिग्राहकांच्या संबंधित गावाच्या मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहे तर अधिक 33 टक्के म्हणजे 5 कोटी 42 लाख हे कृषिग्राहकांच्या जिल्हयातील मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहेत. एकंदरीत 66 टक्के म्हणजे 10कोटी 84 लाख हे गाव व जिल्हा मिळुन मूलभूत सुविधा साठी उपलब्ध होणर आहेत.
तसेच गडचिरेाली जिल्हयातील कृषिपंपधारकांकडून भरल्या गेलेल्या 6कोटी 28लाख रुपयांच्या रक्कमेतून 33 टक्के म्हणजे 2कोटी 7 लाख हे कृषिग्राहकांच्या संबंधित गावाच्या मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहे तर 33टक्के म्हणजे 2केाटी 7 लाख गडचिरेाली जिल्हयातील मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहेत. एकंदरीत 66 टक्के म्हणजे 4 कोटी 14 लाख हे गाव व जिल्हा मिळुन उपलब्ध होणर आहेत.
********
सदर योजनेस प्रतिसाद देत सिरोंचा उपविभागातील एकूण १२६ कृषिग्राहकांनी ३० लाख ८८ हजार रुपयांचा भरना करुन थकबाकी मुक्त झाले.
या योजनेच्या वैशिष्ठयानुसार म्हणजे गडचिरेाली जिल्हयातील कृषिपंपधारकांकडून भरल्या गेलेल्या या कृषिपंप वीजबिलाच्या ३० लाख ८८ हजाराच्या रक्कमेतून ३३ टक्के म्हणजे १० लाख १९ हजार हे कृषिग्राहकांच्या संबंधित गावाच्या मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहे व ३३ टक्के म्हणजे १० लाख ७२ हजार असे हे कृषिग्राहकांच्या जिल्हयातील म्हणजे गडचिरेाली जिल्हयातील मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहेत म्हणजे त्यांच्या गाव जिल्हयाच्या विकासासाठी सिंहाचा वाटा त्यांनी उचलला आहे.
कृषिपंपधारक श्री हरिकुमार व्यंकटेश्वर येनगंट्टी यांनी आपल्याकडील ६ विद्युत बिलांचे एकून २ लाख २६ हजार ३६० रूपये भरना करुन थकबाकी मुक्त झाले तसेच श्री राजंना वेंकय्या शेट्टी यांनी आपल्याकडील ६ विद्युत बिलांचे एकून १लाख ७८ हजार रूपये भरना करुन थकबाकी मुक्त झाले व त्यांचा शाल व श्रिफ़ल देऊन श्री सि यु सडमेक उपकार्यकारी अभियंता सिरोंचा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
तर 31.03.2021 ला एकाच वडसा उपविभाग अंतर्गत एकूण 96 कृषी ग्राहकांनी10.99 लक्ष रुपयांचा भरणा करुन थकबाकी मुक्तिची वाट धरली.
***********************************************************************************************************************************************************************
पुढे पुढे कृषिग्राहकांद्वारा भरल्या जाणारया थकबाकीच्या प्रमाणात हे कृषिग्राहक हे त्यांच्या गावाच्या व जिल्हयाच्या विकासाचे सहभागी ठरणार आहेत. या योजनेचा लाभ कृषिपंपधारकांना व्हावा व येाजनेच्या यशस्वी व्हावी यासाठी महाविरण ठिकठिकाणी मेळावे घेत आहे व त्याद्वारा अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत.चंद्रपूर परीमंडळात 563 ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत, 505 कृशीग्राहक मेळावे, 25 सायकल रॅली, 246 बांधावर महावितरणचे अधिकारी यांनी जावून-कॅपॅसिटरचा वापरामुळे कृशीपंपांना योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळणे, कृशीपंप हाताळतांना घेण्यात येणारी खबरदारी, वीजसुरक्षा याबाबत प्रबोधन केले तसेच कृषी पंप धारकांना कृषी ऊर्जा पर्व बद्दल व होणार्या लाभाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.या सुवर्णसंधी चा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता श्री. सुनील देशपांडे यांनी केले आहे.
विभाग कृषिपंप ग्राहक संख्या भरणा केलेली रककम
चंद्रपूर, 1828 2 कोटी 59 लाख
वरोरा 4196 5 कोटी 93 लाख
बल्लारशा 3349 3 कोटी 87लाख
ब्रम्हपुरी, 5693 4 कोटी 15 लाख
गडचिरोली 4857 3कोटी 32 लाख
आलापल्ली 2405 2 कोटी 96 लाख
