गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
महाराष्ट्रात सन 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक पारपडली.चंद्रपूर जिल्ह्यातील इतर क्षेत्रा बरोबरच राजुरा विधानसभेत सुद्धा जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत उडी घेतली होती. काही अपक्ष तर काहींनी इतर पक्षांच्या उमेदवाराला समर्थन दिले होते. आता निवडणूक आली म्हणजे जाहिरनामे निघणारच यात दुमत नाही. याच पार्श्वभूमीवर भाजप,स्वतंत्र भारत पक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी व इतर पक्ष, अपक्षांसह काँग्रेसने ही जाहिरनामा प्रसिद्ध केला होता.या निवडणुकीत राजुरा 71 मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महाआडीचे अधिकृत उमेदवार "सुभाष धोटे" यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत बाजी मारली आणि ते सध्या याक्षेत्राचे नेतृत्व करीत आहे.आमदार धोटे यांचे आजपर्यंत सर्व काही व्यवस्थीत सुरू असतानाच निवडणुकी दरम्यान आमदार धोटे यांचा फोटो असलेला "युवकांचा जाहिरनामा" अचानकपणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.या जाहिरनाम्यात "सुशिक्षित बेरोजगारांना रू.5000 दरमहा भत्ता, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी" असा आश्वानयुक्त मजकूर लिहिलेला आहे. सोबत सदर विधानसभेतील एका बेरोजगाराने यासंबंधीचा मॅसेज सोशल मीडियावर टाकून विचारले की "आम्हा बेरोजगारांना 5000 कधी देणार.तो मॅसेज अशाप्रकारे आहे.
-----------//------------
मी हितेश गाडगे,राजुरा येथे राहतो, नशिबाने आपल्याच विधानसभेत साहेब, आमदार सुभाष धोटे साहेब यांच्या निवडणुक प्रचारात ज्या घोषणा झाल्या त्यापैकी एक महत्वाची घोषणा म्हणजे सुशिक्षित बेरोजगार यांना 5000 दरमहा भत्ता.
"सुभाष धोटे साहेब आजपर्यंत सगळं उत्तम चालत होता,या कोरोनाच्या महामारीमुळे साहेब,आता आम्हां बेरोजगारावर प्रचंड अडचणीचे दिवस चालले आहेत,कृपया आपण शब्दाचे अगदी पक्के आहात,आपण दिलेला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी करकरीत रेष,आपण साहेब आम्हां बेरोजगारांना 5000 कधी देणार आहात कृपया सांगा,फार आर्थिक विवंचनेत अडकलोय हो आम्ही."
"साहेब मार्ग काढा प्लिज."
(आपलाच विधानसभेतील एक बेरोजगार.)
-----------//---------
"माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे जेव्हा सकाळी,सकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.तेव्हा यांनी केंद्र सरकारला राज्याचे ४० हजार कोटी परत करून तिजोरी रिकामी केली.असे केले नसते तर जरूर बेरोजगारांना रोजगार किंवा बेरोजगार भत्ता दिला असता.राज्य सरकारची आजही इच्छा आहे पण महाराष्ट्राचा जो पैसा आहे केंद्र सरकार देत नाही आहे." अशी प्रतिक्रिया राजुरा विधानसभा सोशल मीडिया प्रमुख विक्रम येरणे यांनी "News34" ला दिली आहे.
काही का असेना पण सदर मॅसेज सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे हे मात्र विशेष.