गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक ठरत असून याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने महाराष्ट्रात ठिकठिकाणी कोविड 19 लसीकरण केंद्र सुरू केले आहे.याच श्रेणीत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात गडचांदूर, कोरपना,नारंडा येथे केंद्र सुरू केले.परंतू नांदा,बिबी,आवाळपूर या गावांच्या कित्येक लोकांना व कंपनीच्या कामगारांना त्याठिकाणी जाऊन लस घेणे अडचणीचे ठरत असल्याने टाळाटाळ केली जात आहे. परिणामी हे लसीकरणा पासून वंचित राहत आहे. ही बाब गंभीरतेने घेऊन नांदा किंवा बिबी येथे लसीकरण केंद्र सुरू करावा अशी मागणी गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,नगरसेवक अरविंद डोहे,माजी पं.स.सभापती संजय मुसळे,माजी नगरसेवक निलेश ताजने, महेश घरोटे या भाजपच्या मंडळींनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली होती.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी यांनी बिबी येथे कोविड 19 लसीकरण केंद्राला हिरवी झेंडी दाखवली.२० एप्रिल रोजी बिबी येथे सदर केंद्र सुरू झाले असून केंद्राचे उदघाटन डॉ.स्वप्निल टेंभे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी आरोग्य सेविका मेश्राम,आरोग्य सेवक कोडापे,आरोग्य अधिकारी डॉ.चंदनखेडे व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. पहिल्याच दिवशी १०० लोकांनी लाभ घेतल्याची माहिती असून बिबी येथे सदर केंद्र सुरू झाल्याने नागरिक आनंद व्यक्त करीत आहे.सदर केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्या भाजप नेत्यांचे नागरिकांनी आभार मानले.