ताजी घडामोडी - राज्यातील सर्व आमदारांना मिळणाऱ्या चार कोटींच्या विकास निधीपैकी एक कोटी रुपये कोरोनासाठी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. असे साडेतीनशेपेक्षा अधिक आमदार आहेत.
त्यामुळे साडेतीनशे कोटी रुपये कोरोनासाठी मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, ऑक्सिजनसाठी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे हे रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासोबत बोलले असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार म्हणून आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करतो आहोत.
कोणीही सत्तेत असेल तरी त्याला आपल्या राज्यातील नागरिकांना उपचार मिळू नये असं वाटणार नाही. आम्ही केंद्राकडे लसीची मागणी करतो आहोत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की सर्व पॉझिटीव्ह रुग्णांना रेमडिसीवीर इंजेक्शन्सची गरज नाही. आम्ही केंद्र सरकारला विनंती केल्यावर केंद्र सरकारने रेमडिसीवीर इंजेक्शन्सची परदेशात निर्यात करणं बंद केलं. आम्ही अनेक कंपन्यांसोबत रेमडीसीवीर इंजेक्शन्स मिळावीत यासाठी चर्चा करत अहोत.