चंद्रपूर - नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याशी आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप केला होता. सचिन वाझे बेटिंगवाल्यांकडून पैसे उकळतात. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक असलेले वरुण सरदेसाई यांचा फोन जातो. तुम्ही बुकींकडे जे पैसै मागितले त्यातील आमचा हिस्सा किती?, असे सरदेसाई यांनी वाझेंना विचारल्याचे फोनवरील संभाषण आहे. याप्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपास करावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली होती.
राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले होते.
शिवसेना नेते वरूण सरदेसाई व भाजप आमदार नितेश राणे यांच्या आरोप प्रत्यारोपाचे राज्यभरात चांगलेच पडसाद बघायला मिळत असून नाशिक नंतर चंद्रपूर जिल्ह्यात युवा सेना जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात भाजप आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी हातात कोंबडी घेत, कोंबडी चोरांचा निषेध असो या पद्धतीने नारेबाजी केली, युवा सेनेचे जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे यांनी राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला व भविष्यात शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करण्यापूर्वी 100 वेळा विचार करण्याचा सल्ला दिला.
आंदोलनात युवा सेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
