चंद्रपूर - कोरोना काळात आपली अविरत सेवा देणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांच्या परिवारावर आज उपासमारीची पाळी आली आहे.
मागील 7 महिन्यापासून कामगारांना वेतन नाही, कोरोनासारख्या भयावह काळात सुद्धा कामगारांनी आपली सेवा दिली होती, जुन्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात आले होते मात्र त्यानंतर नवीन कंत्राटदाराला काम देण्यात आले नसल्याने सर्व कामगारांचे वेतन रखडले.
थकीत वेतन मिळावे यासाठी जनविकास सेनेच्या वतीने अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 500 कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलन सुरू केले. #News34
या आंदोलनाला महिना उलटला तरीसुद्धा वेतनावर साधी चर्चा झालेली नाही, याबाबत वैधकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे सह जिल्ह्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी बैठक लावली मात्र काही दिवसात वेतन देण्यात येईल असे आश्वासन मिळाले.
मात्र आजपर्यंत कामगारांचे वेतन मिळाले नाही, थकीत वेतनाच्या मागणीवर काही निर्णय न होत असताना आज दंडा लेकर आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात महिला कामगार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडकले असता अधिष्ठाता हुमने यांच्या कार्यालयाचे काच फोडण्यात आले, आंदोलकांचा उद्रेक वाढत असताना पप्पू देशमुख यांनी सर्व कामगारांची समजूत काढत आंदोलन थांबविले.
आपण आपल्या रास्त मागणीवर आंदोलन करीत असून मागण्या पूर्ण न होईपर्यंत आंदोलन असेच सुरू असणार अशी प्रतिक्रिया पप्पू देशमुख यांनी दिली.