कोरपना - उन्हाळा आला की गर्मी पासून बचावासाठी मध्यमवर्गीय नागरिक कुलरचा उपयोग करतात मात्र घरातील वीज व्यवस्था बरोबर नसली की त्याचे वाईट परिणाम होतात.
अशीच एक घटना कोरपना तालुक्यातील उपरवाही येथे घडली.
सोनु सत्यपाल पिंगे (वय 22) या महिलेचा कूलरला करंट लागून मृत्यू झाला. आज 27 मार्चला सकाळी दहा वाजता फरशी पुसत असताना कूलरच्या स्टॅन्डला हात लागल्यामुळे तिला विजेचा धक्का बसला. शेजारच्या लोकांनी त्वरित मेन स्विच बंद केला. मात्र सोनू बेशुद्ध पडली होती. काही वेळातच तिचा मृत्यू झाला. कालच तिच्या दोन वर्षीय मुलाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त आईवडील व इतर नातलग आले होते. मृतक महिलेचा पती सत्यपाल पिंगे अंबुजा सिमेंट कंपनीत नोकरीला आहे. महिलेच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. गडचांदूर पोलिस स्टेशनमध्ये महिलेच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आहे.