बल्लारपुर:- 3 जिल्ह्यातून तडीपार असलेला आरोपी आपल्या साथीदारांसह बंदूक घेत स्वगावी परतला पण त्याचा डोक्यात काय होत कुणाचा गेम करायला तो पुन्हा परत आला? या सर्व बाबीचा तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
18 मार्च गुरुवार रात्री पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की शहरातील हद्दपार झालेला (तडीपार) येदुराज उर्फ (बच्ची)रामनरेश आरक रा, सुभाष वॉर्ड हा आरोपी कमरेला खोसून देशी कट्टा (पिस्तूल)घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार उमेश पाटील आपले सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन वस्ती विभाग सर्च करून मोठया शिफातीने रात्री एक वाजता च्या दरम्यान बच्ची उर्फ येदुराज (29)व साथीदार फारुख ऐय्याश शेख रा, बालाजी वॉर्ड दोघांना मोटारसायकल वर फिरत असतांना ताब्यात घेतले व झडती घेतली असता त्यांचा कडून कमरेला खोसलेली देशी कट्टा (पिस्तूल)व साथीदार फारुख याचा खिशात दोन जिवंत काडतुसे मिळाली दोघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. दोघांवरही कलम 425 भारतीय हत्यार कायदा व142 (महाराष्ट्र पोलीस कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तो काय करण्यासाठी पुन्हा बल्लारपूर शहरात परत आला याचा तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
पोलिसांनी वेळेवरच सतर्कता दाखवून मोठा अनर्थ टाळला. ही कारवाई ठाणेदार उमेश पाटील, API गायकवाड, API मुलाणी, PSI टेंभुर्णें,PSI चांदोरे, ना, पो, शी, सतीश पाटील, शरद कुडे,सीमा कोरते, विशिष्ट रंगारी यांनी केले