ताजी बातमी - बुलडाण्यात एक कोरोनाबाधित व्यक्ती जेवणासाठी आणि मद्यप्राशनासाठी कोरोना रुग्णालयाच्या बाहेर पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात एका कोव्हिड सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहराजवळ घाटापुरी येथे एक कोव्हिड सेंटर आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये एक 55 वर्षीय कोरोना रुग्ण जेवणासाठी आणि मद्यप्राशनासाठी कोविड रुग्णालयाच्या बाहेर पडल्याचा प्रकार समोर आला आहे.
विशेष म्हणजे एका हॉटेलवर त्याने दारु प्यायला. त्याच ठिकाणी त्याने जेवण केले.
त्या रुग्णाला मद्यप्राशन जास्त झाल्याने रस्त्याच्या लगत पडला आहे. त्यावेळी काही समाजसेवकांनी त्याला उपचारासाठी खामगाव शासकीय रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे घाटपुरी येथील कोव्हिड सेंटरवर जेवण निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याची बोललं जात होतं. त्यानंतर आता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
घाटपुरी येथील कोविड सेंटरमधून एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चक्क बाहेर जाऊन अनेकांच्या संपर्कात येतो. त्यावेळी कोविड सेंटरमधील सुरक्षा यंत्रणा काय करत असते? तहसीलदार याकडे दुर्लक्ष का करीत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.