घुगूस - शहरात मागील 2 महिन्यापासून सतत चोरीचे सत्र सुरू असून पोलिसांनी अजूनही या घटनांवर नियंत्रण मिळविले नाही.
चोरी करणारे स्थानिक की बाहेरची टोळी यावर मात्र अजूनही प्रश्नचिन्हचं आहे, घरफोडी, दरोड्यासारखे प्रकरण शहरात चांगलेच गाजत असून या अज्ञात चोरांची घुगूस शहरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
घर, दुकान नंतर चोरांनी आपला मोर्चा स्मशान भूमी कडे वळविला असून शहरातील बौद्ध स्मशान भूमीतील दानपेटीवर सुद्धा चोरांनी हात साफ केला.
इतकेच नव्हे तर शव दहिणीचे लोखंडी पत्रे, बसण्याचे बेंच, स्ट्रीट लाईट कव्हर, नळ तोटी सुद्धा चोरांनी लंपास करीत मृतदेह ठेवण्याचे फ्रिजर चोरी करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला.
अज्ञात चोरांची धाडस दिवसेंदिवस चांगलेच वाढत असून चोरीच्या घटनेत वाढ होत आहे.
घुगूस शहरात सध्या चोरांचा धुमाकूळ म्हणजे "चोर मचाये शोर" असा झाला आहे.

