घुगूस - शहरात चोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढत असून घुगूस पोलीस सुद्धा अज्ञात आरोपींच्या शोधात आहे.
शास्त्रीनगर वार्डात राहणारे आर्यन कोमलवार यांनी घुगूस पोलीस स्टेशनला तक्रार दिली की 3 मार्चला कुटुंबातील सर्व सदस्य शहरातील गांधीनगर भागात गेले होते.
आज 8 मार्चला जेव्हा सर्व कुटुंब परतले असता घरासमोरील ताला तोडण्यात आला असल्याचे जाणवले असता घरातील सामान अस्तव्यस्त अवस्थेत होते. #News34
कोमलवार यांच्या घरून 5 ग्रामचे सोन्याचे झुमके, अंगठी व रोख 30 हजार रुपये गायब असल्याचे आढळले तात्काळ कोमलवार यांनी या प्रकरणी घुगूस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
घटनेत अज्ञात आरोपींनी ताला तोडून घरात प्रवेश केला असावा व घरातील पैसे व दागिन्यावर हात साफ केला.
मुद्देमाल पकडून तब्बल 90 हजारांचा माल अज्ञात चोराने लंपास केला.
या प्रकरणी घुगूस पोलिसांनी कलम 454,457,380 अंतर्गत गुन्हा नोंद करीत पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे, सचिन डोहे, सचिन बोरकर, रवींद्र मिटकर व रणजित मुरसे पुढील तपास करीत आहे.
