चंद्रपूर - 1 एप्रिल 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या दारूबंदीची समीक्षा करण्यासाठी 12 जानेवारी 2021 ला समिती स्थापन करण्यात आली होती.
7 मार्चला समितीचा अहवाल शासना समोर सादर करायचे होते समितीचे काम अंतिम टप्प्यात होते परंतु अजूनही काही निकष लावायचा असल्याने समितीला पुन्हा 10 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
17 मार्चला या समितीचा अहवाल शासनासमोर सादर करण्यात येणार असून कॅबिनेट बैठकीत समितीच्या अहवालावर काय निर्णय होणार याकडे चंद्रपूर जिल्हा वासीयांचे लक्ष लागले आहे.
