चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील काग सोनेगाव मधील रेतीघाट लिलावात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची माहिती आम आदमी पार्टीचे जिल्ह्याध्यक्ष सुनील मुसळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सदर रेतीघाट महिला बचत गटाला देत महिला सक्षमीकरणाचे उदाहरण चंद्रपूर जिल्ह्याने सर्वात आधी द्यावे यासाठी अनेक निवेदने देत जिल्ह्याधिकारी अजय गुल्हाने यांची भेट सुद्धा घेण्यात आली होती.
मात्र हा रेतीघाट राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला देण्यात आला, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे व सामाजिक कार्यकर्ते सारंग दाभेकर यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय गाठले असता त्यांच्या समोर आश्चर्यकारक बाब आली, महिला बचत गटाला रेतीघाट देण्यात यावा यासंबधीचे निवेदने कार्यालयातून गहाळ झाल्याचे कळले, पुन्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले मात्र त्यांना त्या घाटाचा लिलाव झाला अशी पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती, दिलेल्या निवेदनावर जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी शेरा मारत ते पत्र खनिकर्म विभागाकडे वळते केले.
मात्र ते पत्र सुद्धा खनिकर्म विभागातून गहाळ झाले असल्याचे कळले असता स्वतः आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुसळे यांनी ते पत्र खनिकर्म विभागातून शोधून काढले. ह्या घाटाचा संपूर्ण लिलाव नियमबाह्य पद्धतीने करण्यात आला असा आरोप आम आदमी यावेळी केला.
आप च्या पत्राची साधी दखल सुद्धा जिल्हा प्रशासनाद्वारे घेण्यात आली नाही याचा अर्थ कुठेतरी भ्रष्टाचार फोफावित आहे.
जिल्हाधिकारी यांनी ह्या घाटाचा लिलाव रद्द करीत महिला सक्षमीकरण बाबत पुनर्विचार करीत तो घाट जागृती महिला बचत गट यांना शासकीय किमतीवर वाटाघाटी करून देण्यात यावा अन्यथा जिल्हाधिकारी गुल्हाने यांना आम आदमी पार्टी न्यायालयात खेचनार असा इशारा सुनील मुसळे यांनी दिला.
सोबतच खनिकर्म विभागाला आम आदमी पक्षातर्फे देण्यात आलेले निवेदन
