चंद्रपूर - ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने युवासेना चंद्रपूर च्या वतीने विविध सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. आपल्या पारिवारिक संसाराचसोबत समाज हितासाठी, प्राणिमात्रांसाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी झटत राहणाऱ्या महिलांच योगदान महत्वपुर्ण आहेत. मुल आणि चुल या चौकटीच्या बाहेर निघून आज महिला विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहेत. या महिलांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीच प्रेरणा मिळावी व त्यांच्या या योगदानाबद्दल आभार म्हानावे या उद्देशाने ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून युवासेना कार्यकारीणी सदस्य रूपेश दादा कदमजी, जिल्हा युवासेना विस्तारक त्रिपाठी जी ,शिवसेना जिल्हा प्रमुख संदिपजी गिर्हे मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.निलेश बेलखेडे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना जिल्हा चंद्रपूर च्या युवासेना वतीने या युवती- महिलांचा त्यांच्या घरी भेट घेऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आपल्या ला सामाजिक कार्य करतांना येणाऱे अनुभव, अडचणी व जिल्ह्याच्या विकासासाठी, महिलासक्षमीकरन साठी कुठले कार्यक्रम राबविण्यात येऊ शकतात जेणेकरून महिला, युवती स्वतःच्या पायावर उभ्या होऊन समाज हिताकरिता चांगल्या भुमिका पार पाडू शकतात याबाबत त्यांचे मनोगत समजून घेण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेश बेलखेडे यांनी चंद्रपूर शिवसेना- युवासेना , महिला आघाडी या सर्व आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर राहिल व आजचं नव्हे तर सदैव महिला सन्मानासाठी ,महिला सक्षमीकरणासाठी आम्ही आपल्या सोबत राहू असे प्रतिपादन केले.
