चंद्रपूर - 100 कोटींच्या वसुलीचा आरोप गृहमंत्री आणि रा. कॉ. नेते अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या IPS परमबीरसिंग यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. चंद्रपूरच्या गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार निदर्शने केली.रा कॉ. कार्यकर्त्यांनी चौकात टरबूज फोडत परमबीर यांच्या फोटोला चपलांचा मार दिला. परमबीरसिंग यांच्या संपत्तीची ACB चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आपल्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांना भाजप बदनाम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय. कार्यकर्त्यांनी हे प्रकरण रेटणा-या भाजप नेते फडणवीस- मुनगंटीवार- पाटील यांचा राष्ट्रवादीने निषेध केला.
यावेळी राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महानगर अध्यक्ष राजीव कक्कड, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, महिला शहराध्यक्ष ज्योती रंगारी व राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
