चंद्रपूर - 16 मार्चला दुपारी 1 वाजेदरम्यान जनता महाविद्यालय चौकातील ट्रॅफिक सिग्नलवर राजस्थान पासिंगचे 2 ट्रक यांनी सिग्नल तोडत पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रक चालकाने ट्रक वाहतूक पोलिसांच्या अंगावर नेला असता पोलीस कर्मचाऱ्याने लगेच बाजूला उडी मारल्याने त्याचे प्राण बचावले, अचानक घडलेल्या या घटनेत नागरिकांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याकडे धाव घेतली.
चौकात उभे असलेले कांग्रेसचे प्रशांत भारती यांनी हा प्रकार बघताच स्वतःचे वाहनाने ट्रक चा पाठलाग केला, वाहतूक कार्यालयाजवळ तो ट्रक भारती यांनी थांबविला.
ट्रकमध्ये असलेले 3 जण उतरुन पसार झाले मात्र वाहन चालक त्यांचा हाती लागला, भारती यांनी तो ट्रक वाहतूक कार्यालयात लावला असता ट्रक मध्ये नेमकं काय आहे हे बघण्यासाठी प्लास्टिक पत्रे काढल्यावर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली.
त्या ट्रकमध्ये 50 ते 60 गाय यांना ठेवण्यात आले होते, राजस्थान वरून त्यांना आंध्रप्रदेश येथे कत्तलखान्यात नेत असल्याची खात्री पटल्यावर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये वाहनचालकावर गुन्हा दाखल करीत पोलिसांनी त्या गाय उज्वल गोरक्षण संस्थेत नेल्या.
पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
(सदर बातमी कॉपी करून कशाला स्वतःची लाज काढता, पत्रकार (News34) असेल तर बातमी स्वतः लिहू शकता असे चिल्लर काम करू नका)
