घुग्घुस: घुग्घुस चंद्रपुर हाई-वे 6 घुग्घुस बस स्टाप चौपदरी रोडवर फुट-पाथ रोडवरती अनेक दुकानें असल्याने दुकानाची घाण, पाणी, कचरा, रोडवर टाकल्या जात आहे, दुचाकी व इतर वाहनाना याचा खुप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बस स्टाप मुख्य चौपदरी पाईंट, रोड लगतची दुकानें हटविण्यात यावी अशी मागणी नागरिकातर्फे केल्या जात आहे, संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कार्रवाई करावी. सकाळच्या वेळी पान टपरी,दोसा, हाटेल, तसेच अन्य दुकाना जवळ वाहनांची गर्दी चौपदरी रोडच्या फुट-पाथवर दिसून पड़ते मोठ्या अपघाताला आमंत्रण नाकरता येत नाही.
मुख्य चौपदरी रोडवर वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावी, व मुख्य मार्ग मोकळा करुन वाहन चालकांना व इतर नागरिकांना याचा त्रास व्हायला नको यासाठी घाण पाणी, कचरा, पासून रोडवरती डुकंराचा व इतर जनावरांचा मुळे दुचाकी स्लिप होऊन पडतात, मोठा अपघाताला नाकारता येत नाही, याआधी या मार्गावर अनेक अपघात झाले असून या मार्गावर वाहतूक पोलिसांनी दक्षता बाळगावी व या मार्गावरील बेभान वाहतुकीवर नजर ठेवण्यात यावे अशी मागणी नागरिकातर्फे प्रशासनाला करण्यात येत आहे.
