चंद्रपूर - तुकूम परिसरातील मातोश्री शाळेच्या मागे आज दुपारी 27 वर्षीय युवतीने गळफास घेत आत्महत्या केली.
मृतक युवतीचे नाव 27 वर्षीय मोनाली रुपेश टेकाम असून तिने आत्महत्या का केली याच कारण अजूनही अस्पष्ट आहे.
ज्यावेळी युवतीने गळफास घेतला त्यावेळी घरी कुणी नव्हते, युवतीची आई व बहीण काही कामानिमित्त बाहेर गेले होते.
अचानक घडलेल्या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी दुर्गापूर पोलीस स्टेशनला दिली मात्र पोलीस घटनास्थळी तब्बल दीड तासानंतर पोहचले.
घटनेचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.
