चंद्रपूर - होळीच्या संध्येला लोहारा समोर दुचाकी झाडाला आढळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
करन जाधव व पवन शेट्टी हे दोन्ही युवक मूल मार्गे चंद्रपूर कडे येत असताना लोहारा जवळ ट्रक ला ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने दुचाकी वाहन हे समोरील झाडावर आदळले.
धडक इतकी जोरदार होती की दोघे युवक जागीच ठार झाले. सदर युवक इंदिरानगर येथील रहिवासी होते.
रामनगर पोलीसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करीत मृतदेह पोस्टमार्टम करीता रुग्णालयात पाठविले.
