राजुरा - शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कांग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या मेघा नलगे यांना चांगलेच महागात पडले.
12 मार्चपासून देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती, मात्र उदघाटन कार्यक्रमाची वेळ सकाळी 10.30 वाजता निश्चित करण्यात आली होती मात्र जिल्हा परिषद सदस्य नलगे यांनी दुपार नंतर येऊ सांगितले, परंतु लसीकरण मोहीम शासकीय कार्यक्रम असल्याने तो नियोजित वेळेवर सुरू करायचा होता, वैद्यकीय अधिकारी डॉ. डूडूळे यांनी नागरिकांना लसीकरणाला थांबविणे योग्य नसल्याचे वाटले व पंचायत समिती सभापती मुमताज यांना फोन करून उदघाटन कार्यक्रमाला येण्याची विनंती केली मात्र त्यांनी सुद्धा येण्याचे टाळले.
त्यानंतर डॉ. करमनकर, सरपंच सौ. पंधरे, माजी पंचायत समिती सदस्य जमीर शेख यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहीमेला सुरुवात करण्यात आली.
16 मार्चला दुपारच्या सुमारास डॉ. डूडूळे रुग्णांची तपासणी करीत असताना जिल्हा परिषद सदस्य मेघा नलगे अचानक येत त्याठिकाणी गोंधळ सुरू केला.
सर्वांच्या समोर डॉ. डूडूळे यांना जातीवाचक शिवीगाळ करीत, बदली करण्याची धमकी दिली.
या प्रकाराची डॉ. डूडूळे यांनी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये करीत कांग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य मेघा नलगे यांच्या विरोधात एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला.
घटनेचा पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.
