प्रतिनिधी/सै. मुमताज अली
गडचांदूर - मागील 25 वर्षांपासून शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या गडचांदूर नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक शिवसेना उपजिल्हाप्रमुख धनंजय छाजेड यांनी पक्ष व सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने गडचांदूर शहरातील राजकारणात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.यामागे छाजेड यांनी कौटुंबिक कारण समोर केलं असून आपण नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात असमर्थ ठरत आहो ही बाब आपण जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या निदर्शनास आणून दिली असून यांचेकडून पण अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता अशी खंत सुद्धा छाजेड यांनी यावेळी व्यक्त केली.
छाजेड यांच्या राजीनाम्याच्या घडामोडीनंतर भाजप नगरसेवक अरविंद डोहे यांनी छाजेड हे आमचे चांगले मित्र आहे, त्यांना आपण भाजप पक्षात आणण्याचे प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
