घुगूस - क्षुल्लक कारणावरून वेकोलीच्या सुरक्षरक्षकाला चड्डा ट्रान्सपोर्ट च्या सुपरवायझर ने मारहाण केली.
याप्रकरणी सुरक्षारक्षकाने घुगूस पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केला असून पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंद केला आहे, मात्र आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला पोलिसांनी ताकीद देत सोडून दिले पुढची कारवाई बाल न्यायालयात होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
20 वर्षीय सुरक्षारक्षक सचिन जूनघरी हा घुगूस मधील CHP बंकर येथे कार्यरत आहे.
21 मार्चला रात्री 8.30 वाजे दरम्यान CHP बंकर ब्रेक डाउन झाल्याने आय आर बंकरवर कोळसा टाकायचा होता, मात्र त्याच वेळी चड्डा ट्रान्सपोर्ट चा अल्पवयीन सुपरवायझर त्याठिकाणी आला व इथे गार्ड कोण आहे अशी विचारणा करू लागला.
त्यावेळी कर्तव्यावर असलेले सचिन जुनघरी, आकाश धानोरकर, अक्षय अहिरकर जेवण करीत होते.
अल्पवयीन सुपरवायझर ने आम्हाला आय आर बंकरवर कोळसा खाली करायचा असे सांगत तुमच्या वरिष्ठांशी बोलणे झाले आहे असे सांगितले मात्र सुरक्षारक्षकांना याबाबत वरिष्ठांचा फोन आला नसल्याने आम्हाला एकदा वरिष्ठांशी बोलावे लागेल असे सांगत फोन लावला असता मात्र फोन ला प्रतिसाद मिळाला नाही, लगेच आम्ही सब एरिया मॅनेजरला फोन लावला परंतु त्या अल्पवयीन सुपरवायझर ने फोन करायला इतका वेळ लागतो का म्हणत दुचाकी गाडीवर असलेला दांडा हातात घेत सुरक्षा रक्षकांना मारहाण करायला सुरुवात केली.
लगेच त्या सुपरवायझर ने आपल्या साथीदारांना बोलावले, त्यावेळी राकेश शर्मा, सचिन साठे व सूरज सिंग आले त्यांनी सुद्धा सुरक्षारक्षकांना मारहाण करू लागले.
सुरक्षारक्षकांनी तात्काळ सुरक्षप्रमुखाला फोन केला पण मारहाण करणारे तिथून पळून गेले, शासकीय कामात चड्डा ट्रान्सपोर्ट च्या कर्मचाऱ्यांनी अडथळा आणला व सुरक्षारक्षकांना मारहाण केली याबाबत घुगूस पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
