घुग्घुस : स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी महिलांना शोषणा पासून मुक्ती मिळवून देण्यासाठी स्वतः दगड धोंडे खाल्ले हाल अपेष्टा शिवीगाळ अपमान सहन केला.
मात्र एवढया हाल अपेष्टा सहन करीत न डळमळता महिला शिक्षणा साठी शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात 1848 साली पहिली मुलींची शाळा उघडणाऱ्या
स्त्री मुक्तीदाता सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची 10 मार्च रोजी पुण्यतिथी असून घुग्घुस शहर काँग्रेस तर्फे काँग्रेस कार्यलयात त्यांना पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कांग्रेस शहर अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, देवानंद ठाकरे, नुरूल सिद्दीकी, रोशन दंतलवार, सुनील पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
