ब्रह्मपुरी - 10 मार्चला ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत संशयास्पद रीतीने फिरणाऱ्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार 24 वर्षीय विकास अजय शर्मा हा दुचाकीने जात असताना ब्रह्मपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारपूस करीत किरायाने राहत असलेल्या घराची झडती घेतली असता चोरीच्या दुचाकी आढळल्या.
पोलिसांनी त्या घरून 1 होंडा शाईन, 1 ड्रीम युगा, 2 होंडा ऍक्टिवा अश्या एकूण 5 दुचाकी जप्त केल्या, सर्व दुचाकी चोरी केली असल्याची कबुली आरोपीने दिली. #News34
ब्रह्मपुरी पोलिसांनी तब्बल 2 लाख 71 हजारांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी शर्मा वर गुन्हा नोंद करून चौकशी सुरू केली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक उपरे, अरुण पिसे, मुकेश गजबे, अमोल गिरडकर, संदेश देवगडे, अजय कटाईत, विजय मैद, योगेश शिवणकर, नरेश कोडापे, पूजा राऊत, शुभांगी शेमले यांनी यशस्वीपणे पार पाडली.
