चंद्रपूर - प्राणी मात्रावर दया करा हा संदेश नेहमी सुजाण नागरिक देत असतात, कारण जगात सर्वाना जगण्याचा अधिकार असून प्राणी नसेल तर पर्यावरणही नसेलचं.
मात्र चंद्रपूर शहरातील काही टवाळखोर नागरिक आजही प्राणी मात्रांवर अत्याचार करताना दिसत आहे.
मंगळवारी अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका श्वानाच्या मूत्र मार्गावर काही टवाळखोरांनी दोरी बांधली व त्या श्वानाल मरण्यासाठी सोडून दिले.
असे किळसवाणे कृत्य करून नागरिकांना कसला आनंद असेल असा प्रश्न फाउंडेशनचे संस्थापक डॉ.देवेंद्र रापेल्ली यांनी उपस्थित केला.
या अवस्थेत तो श्वान प्यार फाउंडेशनला आढळला असता त्याच्यावर उपचार करीत ती दोरी तात्काळ काढत त्या श्वानाला जीवदान देण्यात आले.
ज्याने ही हे कृत्य केलं असेल त्याच्या जवळ हा श्वान विश्वास ठेवून गेला असेल मात्र असे विकृत मानसिकतेसारखं किळसवाणे कृत्य आजही कुणाला पटत नाही.
त्या टवाळखोराचा शोध लागला पाहिजे व त्याला कठोर शिक्षा द्यायला हवी जेणेकरून कुणीही उद्या प्राण्यांवर असले प्रकार करणार नाही.
