चंद्रपूर - रामाला तलावाच्या संवर्धनासाठी मागील 12 दिवसापासून सुरू असलेले इको प्रो चे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन आज प्रशासनाच्या लेखी आश्वासनांनंतर मागे घेण्यात आले.
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आंदोलनाची दखल घेत 7 दिवसात अहवाल सादर करायला सांगितले आहे. बंडू धोतरे यांचं अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन मंडपात तहसीलदार निलेश गौड यांनी उपस्थित राहून, लेखी आश्वासन धोतरे यांना सोपविले व धोतरे यांचं अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन मागे घेण्यात आले.
लवकरच रामाला तलावाचे खोलीकरण, सौंदर्यीकरण होणार आहे.