गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहरातील बंगाली कॅम्पचे रहिवासी गेल्या ३५ वर्षांपासून वीज,पाणी, रस्ते,नाली,अंगणवाडी अशा आवश्यक व मुलभूत सुविधांपासून वंचित असून आजपर्यंत लोकप्रतिनिधी कडून निव्वळ आश्वासनांची खैरात वाटली गेली,सुविधा मात्र उपलब्ध करून देण्यात आली नाही. येथील त्रस्त नागरिकांनी यासाठी अनेकदा संबंधितांकडे पत्रव्यवहार केले परंतु बलाढ्य कंपनीपुढे हतबल असलेल्यांनी याकडे लक्ष दिले नाही परिणामी निराशाच पदरी पडली.शहरातील इतर प्रभागातील नागरिकांना मिळत असलेली सुविधा आम्हालाही मिळावी यासाठी कित्येकदा संबंधितांचे उंबरठे झिजवल्याची जळजळीत भावना कॅम्पवासी व्यक्त करताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर बंगाली कॅम्पवासीयांनी प्रहारच्या माजी तालुकाध्यक्ष सतीश बिडकर यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली.बिडकर यांनी सदर कॅम्प परिसराची पाहणी केली असता त्याठिकाणी अक्षरशः दयनीय परिस्थिती पहायला मिळाली.अनेक नेत्यांनी याठिकाणी येऊन अश्वासने दिली.परंतु ते दरवेळी हवेतच विरले. असे आरोप होत आहे.
सदर कॅम्पच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत रस्ते,नाली,वीज,पाणी इतर सुविधा मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न बिडकरांनी सुरू केले.याच श्रेणीत गेल्या ३५ वर्षांपासून अंदाजे १०० कुटुंब एकच बोअरवेलवरून पाणी घेत होते आता मात्र नळाच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध झाली असून आगामी काळात बोरींग मारून देण्याचे आश्वासन संबंधितांकडून देण्यात आल्याची तसेच विजेची समस्या सुद्धा मार्गी लागणार असून विज संबंधीचा पाठपुरावा शेवटच्या टप्प्यात असल्याने बंगाली कॅम्प लवकरच प्रकाशमान होणार असल्याची माहिती बिडकर यांनी New34 ला दिली आहे.समस्या मार्गी लावण्यासाठी करण्यात येत असलेला पाठपुरावा व अथक प्रयत्नांना यश प्राप्त होत असल्याने बंगाली कॅम्पवासीयांनी प्रहारचे बिडकर यांच्या प्रति आभार व्यक्त केले आहे.
------------//---------
"नळ कनेक्शन दिल्यानंतर बंगाली कॅम्प येथे काय घडले,कुणी नळ कनेक्शनची केली तोडफोड,याविषयी सविस्तर लवकरच.....!"
-------------//---------
