चंद्रपूर - 13 फेब्रुवारीला गुजरात ते अरुणाचल प्रदेशातील इटानगर चा 4 हजार 100 किलोमीटरचा प्रवास सायकलीने करून चंद्रपुरातील नामदेव राऊत यांनी पूर्ण केला होता, टायगर ग्रुप ऑफ एडव्हेंचर व क्रिडाभारती यांच्या संयुक्त विद्यमाने या सायकल प्रवासाचे आयोजन करण्यात आले होते.
26 दिवसांच्या ह्या प्रवासात राऊत यांनी गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश , बिहार ,प.बंगाल आसाम आणि अरुणाचल प्रदेश ई प्रदेशातून सायकल चालवीत सायकल चलाव ,पेट्रोल बचाव, पर्यावरण बचाव विषयी जनजागृती केली. #News34
21 फेब्रुवारीला नामदेव राऊत चंद्रपूरला परत आले ते परत आल्यावर त्यांचा विविध ठिकाणी सत्कार सुद्धा करण्यात आला, मात्र आता त्यांच्या सायकल रॅली चा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्या वर चांगलीच नामुष्की ओढावली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये नामदेव राऊत हे सायकलने प्रवास करीत आहे मात्र ते दुचाकींचा आधार घेत, हा व्हिडीओ रस्त्यावर जाणाऱ्या एकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद करीत व्हायरल केला, आता त्यांची सायकलवारी संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

Namdev Raut ni tr dakhvla tyanni kashi cycle ride keli te pn tumhala sangu icchito Pranali Chikte navachi ek mulgi gelya 130 days pasun enviornmet cha msg det cycle ne firat ahe tichi dakhal ghya ti ekti mulgi karat ahe
उत्तर द्याहटवाtichi mahiti pahije aslyas mala contact kara 9767820123