घुगूस - घुगूस ग्रामपंचायत नंतर नगरपरिषद अस्तित्वात आली असली तरी ग्रामपंचायत ते नगरपरिषद अस्तित्वात आल्यावर सुद्धा शहरातील पथदिव्यांचा वीजबिल भरणा केला नाही.
विशेष म्हणजे घुगूस ग्रामपंचायत असतांना अनेक विकासात्मक कामे झाली मात्र त्यावेळी जर ग्रामपंचायत सदस्य व सचिवांनी पथदिव्यांच्या विजबिलाकडे लक्ष दिलं असत तर आज विजबिलाची थकबाकी 98 लाखापर्यंत पोहचली नसती.
ग्रामपंचायत च्या हलगर्जीपणा मुळे घुगूस शहरातील पथदिवे बंद होण्याच्या मार्गावर आहे, नागरिकांकडून कर वसुली केल्यावर सुद्धा पैसे गरज नसलेल्या कामांवर खर्च झाले.
कोरोना काळातील वीज बिलापासून नागरिकांना काही प्रमाणात सूट मिळणार मात्र तसे काही झाले नाही आज नागरिकांचे अमाप वीजबिल झाले असून आता महावितरणने वीज तोडणी मोहीम सुरू केली आहे.
घुगूस शहरात पथदिव्यांचे वीजबिल 98 लाखांच्या घरात पोहचले आहे, महावितरणने नगरपरिषदेला 24 तासांच्या आत म्हणजेचं 27 मार्च सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजबिल भरा अन्यथा शहरातील पथदिव्यांची वीज कापण्यात येणार असा अल्टीमेटम महावितरणने दिला आहे.
सध्या शहरातील 4 हजार 626 घरगुती विजग्राहकांची थकबाकी 2 कोटी 86 लाख झाली आहे.
महावितरणने घुगूस शहरातील नागरिकांना वीजबिल भरणा करण्यासाठी 3 इन्स्टॉलमेंट प्रमाणे विजबिलाचा भरणा करा मात्र त्यासाठी आधी 33 टक्के भरणा करणे आवश्यक राहणार अशी मुभा सुद्धा महावितरणने दिली आहे अशी माहिती सहायक अभियंता अमोल ढुमने यांनी दिली आहे.
