चंद्रपूर - दारुबंदीनंतर जिल्ह्यात भ्रष्टाचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून अवैध धंदे तर सोडाच मात्र भ्रष्टाचारावर नियंत्रण सुद्धा ठेवण्यात प्रशासन अयशस्वी ठरले.
शासकीय विभागात आज मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो मात्र यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे, तो विभाग हा भ्रष्टाचार नियंत्रणात आणू शकतो काय? हा मोठा प्रश्न आहे.
आज जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या तक्रार होतात मात्र लाचलुचपत विभाग नागपूर किंवा गडचिरोली वरून कारवाईसाठी चमू येतात मग चंद्रपूर लाचलुचपत विभाग काय करीत आहे? नागरिकांचा चंद्रपूर लाचलुचपत विभागावर विश्वास आहे की नाही?
ब्रह्मपुरी, गोंडपीपरी येथे झालेल्या ट्रॅप मध्ये गडचिरोली लाचलुचपत विभागाने कारवाई केली मात्र चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार का झाली नाही?
चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा ट्रॅप लावण्यात आले होते मात्र ते यशस्वी झाले नाही त्याच कारण हे आजपर्यंत समजू शकले नाही, काहीही असो पण सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील भ्रष्टाचाराला आळा आणण्याचं काम नागपूर व गडचिरोली लाचलुचपत विभाग करीत आहे.
एक दिवस थ्री इडियट या चित्रपटातील गाण्यासारख लाचलुचपत विभागाला शोधावे लागेल, "बहती हवा सा था वो, उड़ती पतंग सा था वो, कहा गया उसे ढूंढो"