जिवती - दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला गोंडवाना गणतंत्र पार्टीने समर्थन दिले असून येत्या ८ फेब्रुवारीला पांडुरंग जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जिवती येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यात बाबुराव मडावी जिल्हा अध्यक्ष, गजानन पाटील जुमनाके राजुरा विधानसभा अध्यक्ष,महेबूब शेख प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश,अब्दुल जमीर अब्दुल हमीद जिल्हा उपाध्यक्ष,मुनिर मकबूल सय्यद जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक सेल,निशिकांत सोनकांबळे जेस्ट नेते,ममताजी जाधव,भीमराव पाटील मेश्राम माजी सभापती,हन्मंतु कुमरे माजी सरपंच,जमालूदिन शेख,वागू उईके,फारुख शेख अध्यक्ष शोशल मीडिया सेल राजुरा विधानसभा हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.तरी यात मोठ्या संख्येने शेतकरी,गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आहवाहन करण्यात आले आहे.