चंद्रपूर - दुर्गापूर व रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी वाहनांची चोरी करणारा आरोपी 36 वर्षीय निलेश गरगेलवार हा स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत सापडला.
21 फेब्रुवारीला स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून सदर आरोपी याने जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी निलेशचा शोध घ्यायला सुरुवात केली आरोपी हा विठ्ठल मंदिर वार्ड निवासी असल्याची माहिती मिळाली असता तो स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला.
त्याची चौकशी केली असता त्याने रामनगर व दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी वाहनांची चोरी केली असल्याची कबुली दिली. #news34
सदर आरोपी कडून 3 दुचाकी असा एकूण 1 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बोबडे, सपोनि गदादे, आतकुलवार, चंदू नागरे, अमजद खान, कुंदनसिंग बावरी यांनी यशस्वीपणे पार पाडली.
