चंद्रपूर - ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प, चंद्रपूर येथे 9 फेब्रुवारीला सकाळी अर्जुनी गावालगत भानुसखिंडी येथील प्रल्हाद किटे यांच्या शेताजवळ नर वाघाचा मृतदेह आढळला होता, वनविभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत, वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले, वाघाचा मृत्यू 2 वाघांच्या झुंजीत झाला असा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. #News34Chandrapur
मृत वाघ हा 3 वर्षाचा होता, वाघाच्या मानेवर, चेहरा व पायावर गंभीर जखमा होत्या, वनविभागाच्या वतीने मृत वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्याला दफन करण्यात आले.
