चिमुर:- देशाचे अर्थमंत्री नामदार निर्मला सीतारमण यानी नुक्त्याच सादर केलेल्या वार्षिक अर्थसंकल्पात पेट्रोल व डीझेल वर तसेच कृषि कायद्याच्या विरोधात चिमुर तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करुण तहसीलदार संजय नागतिलक यांना निवेदन देण्यात आले.
पेट्रोल डीझेल व गॅसच्या किमतीत मागील तीन महिन्या पासून सतत वाढ होत आहे, त्यावर नियंत्रण आणण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे, देशात इंधनाच्या किमतीत वारंवार वाढ होत असल्याने वाहतुकीच्या दरात वाढ होऊन जीवनाशक वस्तुच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे महगाई वाढली असून सर्वसामान्य जनतेला जीवन जगने अशक्य झाले आहे, कोरोनासारख्या महामारिच्या लोकड़ौऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत, नैसर्गिक आपतिमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न कमी होत ते कर्ज बाजारी झाले आहेत, देशातील भाजपा सरकारने जीवनावश्यक वस्तुच्या कीमती स्थिर ठेवन्याएवजी ईंधन दरवाढ, राकेल वारिल सब्सिडी बंद करून सर्वसामान्य गोरगरीब मध्यमवर्गीय जनतेला महागाइच्या खाइत लोटल्यामुळे केन्द्रसर्कारच्या विरोधात चिमुर तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करीत तहसीलदार संजय नागतिलक यांचे मार्फ़त जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना निवेदन देण्यात आले,
या वेळी उपतालुका प्रमुख रमेश भिलकर, बंडू पारखी, सुधाकर निवटे, श्रीहरी सातपुते, किशोर उकुंडे, संतोष कामडी, किशोर उकुंडे,रोशन जुमड़े, कमलाकर बोरकर, विद्या घुघुसकर, दीपकौर भौंड, शैला पाटिल, विलास मेश्राम, धर्मेंद्र ओगले, ताराचंद राउत, जगदीश शिवरकर, शंकर भानारकर, रविदास चव्हाण, सुदर्शन जामभुलकर, मुकेश चिलकुलवार, मंगेश कोसरे, कवडु खेड़कर, व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.