प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - शुभम फुटाणे अपहरण व हत्याकांड प्रकरणात आज मृतक शुभमचा मोबाईल घटनास्थळावरून मिळाला, कुजलेल्या अवस्थेत शुभमचा मृतदेह आढळला होता मात्र शुभमचा मोबाईल कुठं आहे? यावर घुगूस पोलिसांनी श्वान पथकाच्या साहायाने तो शोधून काढला.
मात्र आरोपी गणेश पिंपळशेंडे हा पोलिसांना अजूनही तपासात सहकार्य करीत नाही आहे.
आरोपी गणेशच्या पोलीस कोठडीचे आता 2 दिवस उरले असून या कालावधीत अजून काय माहिती पडणार हे 2 दिवसानी कळेलच.
त्या मोबाईलवरून पोलिसांना महत्वाची माहिती मिळेल.
