चंद्रपूर - कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० अंतर्गत कृषिपंपधारकांना वीजबिलात सवलत देण्याच्या योजनेतून चंद्रपूर परिमंडलातील –चंद्रपूर व गडचिरेाली जिल्हयाचा समावेश असणारया चंद्रपूर, वरोरा, चंद्रपूर, ब्रम्हपुरी, गडचिरोली व आलापल्ली विभागातील एकंदरीत ३ हजार ९३४ कृषिपंप ग्राहकांनी ३ कोटी ४३ लाख हजार रुपयांचा भरणा दिनांक २४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत केला आहे. यात चंद्रपूर जिल्हयातील ५८ हजार ५७ ग्राहकांपैकी ३ हजार ९३४ ग्राहकांनी २ कोटी ६० लाख ६४ हजार तर गडचिरोली जिल्हयातील २१ हजार ४१९ ग्राहकांपैकी १ हजार ३५३ ग्राहकांनी ८३ लाख १२ हजार रुपयांचा भरणा करुन थकबाकी मुक्तिची वाट धरली.
या योजनेच्या वैशिष्ठयानुसार म्हणजे चंद्रपूर जिल्हयातील कृषिपंपधारकांकडून आजपर्यंत भरल्या गेलेल्या या वीजबिलाच्या २ कोटी ६० लाखाच्या रक्कमेतून ३३ टक्के म्हणजे ८५ लाख ८० हजार हे कृषिग्राहकांच्या संबंधित गावाच्या मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहे तर ३३ टक्के म्हणजे ८५ लाख ८० हजार असे १ कोटी ७१ लाख हे जिल्हयातील कृषिग्राहकांच्या मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहेत.
तसेच गडचिरेाली जिल्हयातील कृषिपंपधारकांकडून आजपर्यंत भरल्या गेलेल्या ८३ लाख १२ हजार रुपयांच्या रक्कमेतून ३३ टक्के म्हणजे २७ लाख ३९ हजार हे कृषिग्राहकांच्या संबंधित गावाच्या मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहे तर ३३ टक्के म्हणजे २७ लाख ३९ हजार असे ५४ लाख ७८ हे कृषिग्राहकांच्या गडचिरेाली जिल्हयातील मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहेत.
पुढे पुढे कृषिग्राहकांद्वारा भरल्या जाणारया थकबाकीच्या प्रमाणात हे कृषिग्राहक हे त्यांच्या गावाच्या व जिल्हयाच्या विकासाचे सहभागी ठरणार आहेत. या योजनेचा लाभ कृषिपंपधारकांना व्हावा व येाजनेच्या यशस्वी व्हावी यासाठी महाविरण ठिकठिकाणी मेळावे घेत आहे व त्याद्वारा अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत.
प्रादेशिक संचालक नागपूर श्री. सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनात मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ श्री सुनिल देशपांडे यांनी चंद्रपूर व गडचिरोली मंडलातील चंद्रपूर, वरोरा ,चंद्रपूर, गडचिरेाली, ब्रम्हपुरी व आलापल्ली अशा सहाही विभागातील २९ उपविभागांतर्गत जनमित्र, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता सोबत कृषी वीज धोरण २०२०, कृषीपंप विजबिलाची वसुली आणि अकृषक थकबाकी वसुली बाबत थेट संवाद साधला. तसेच विविध ग्रामपंचायती अंतर्गत कृषीपंपधारकांचे मेळावे घेत कृषीपंपधारकांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले.
मुल उपविभागाअंतर्गत (चंद्रपूर विभाग) चिरोली ग्रामपंचायत जसचे तसेच वरोरा उपविभागाअंतर्गत (वरोरा विभाग) मनगाव ग्रामपंचायत येथे पार पडलेल्या मेळाव्यात प्रादेशिक संचालक नागपूर श्री. सुहास रंगारी यांचे आव्हानाला प्रतिसाद देत चिरोलीतील ४४ कृषी ग्राहकांनी ३ लक्ष ६६ हजार रुपयाचा तर मनगावातील ३८ कृषी ग्राहक २.८८ लक्ष रुपयाचा भरणा करून कृषी वीजबिल थकबाकी मुक्त झाले. चंद्रपूर उपविभाग ३ अंतर्गत पिपरी येथे ४९ कृषी ग्राहकांनी ५ लक्ष रुपयाचा भरणा करून थकबाकी मुक्त झाले. यावेळी मुख्य अभियंता चंद्रपूर श्री. सुनील देशपांडे , अधीक्षक अभियंता चंद्रपूर संध्या चिवंडे तसेच पंचायत समिती सदस्या सौ. वर्षाताई लोनबले, सरपंच सौ. मिनल लेनगुरे हे अधीक्षक अभियंता प्रादेशिक कार्यालय( प्रकल्प) श्री हरिष गजबे, सरपंच श्री. खामनकर, उपसरपंच श्री. येरेकर , ग्रा,पं, आदींच्या उपस्थित होते. या मेळाव्यात कृषी योजना २०२० बद्दल सविस्तर माहीती शेतकऱ्यांना देण्यात आली.
तसेच गडचिरोली मंडल अंतर्गत आलापल्ली विभागातील सिरोंचा उपविभागीय कार्यालय अंतर्गत शानगोंडा गावात श्री.प्रभाकर शानगोंडा (पंचायत समिती सदस्य),श्री. ताला वेंकना(माजी सरपंच),श्री.पानते मलाय्या(सरपंच), व इतर गावातील प्रतिष्टीत नागरिक व शेतकरी यांच्या उपस्थितीत घेतलेल्या मेळ्याव्यात ३५ कृषीग्राहकांनी ११ लक्ष रुपयाचा भरणा करून कृषी विजबिल थकबाकी मुक्त झाले. गडचिरोली विभागातील ग्राहक श्री चंद्रहास भुसारी यांनी एकमुस्त १ लाख् ३९ हजार रक्कम रक्कम भरुन थकबाकीमुक्तिची कास घरली. अनेक ग्राहकांन या योजनेस प्रतिसाद देत मोठया रक्कमेचे कृषीपंपाचे वीजबिल भरले आहे. अशा सर्व ग्राहकांचा महावितरणद्वारा कृतज्ञता व्यक्त करीत सत्कार करण्यात येत आहे. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या वीज कर्मचारी याचाही सत्कार करण्यात येत आहे.
या योजनेमधून चंद्रपूर परिमंडलातील चंद्रपूर व गडचिेरोली या दोन जिल्हयातील एकूण ७९ हजार ३०४ ग्राहकांना त्यांच्या २३३ कोटीच्या कृषीपंप थकबाकीवर १८ कोटीची ६७ लाखाची सूट व सोबतच २१ केाटी ३३ लाख विलंब आकार व व्याज म्हएाजे एकत्रितपणे ४० कोटी माफ होवून १९२ कोटी अशा सुधारीत निर्धारीत थकबाकी थकबाकीपैकी निम्मिच रक्कम म्हणजे ९६ कोटीच कृषिग्राहकांनी भरायचे आहेत. एकत्रिपणे घसघशीत १३६ कोटी हे कृषिग्राहकांचे माफ होणार असून थकबाकीमुक्तिची सोबतच त्यांना त्यांच्या गावाच्या व जिल्हयाच्या विकासाची संधी मिळाली आहे.


