चंद्रपूर - :- कमी झालेले कोरोना रुग्ण आता नव्यानं वाढू नये यासाठी महानगर पालिकेने आधीच पूर्व तयारीला लागले आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोना बाधित दिसू लागल्यानं चंद्रपूर पालिकेने निर्ढावलेल्या लोकांचे कासरे आवरायला सुरुवात केली.त्यासोबतच मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवहणाला प्रतीसाद देत, गांधी चौकात एक मोहीम राबवत मास्क न घातलेल्या लोकांना, त्यासोबतच गर्दी जमवलेल्या व्यवसायिकांना आणि मास्क न घातलेल्या दुकानादाराणा दंड करण्यात आला. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर लोकांमध्ये बिनधास्तपणा आला होता. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्याही काळजीचा विसर त्यांना पडला होता. जणू काही कोरोना पूर्णपणे गेला, या अविर्भावात नागरिक सर्वत्र वावरू लागले होते. अशातच चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं कमी झाली होती. त्यामुळं बहुसंख्य लोक मास्कचा वापर न करताच बाहेर फिरू लागले. मात्र आता पुन्हा एकदा या आजारानं डोकं वर काढायला सुरुवात केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शहर महानगर पालिकेने आज गांधी चौकात मास्क न घातलेल्या लोकांवर कारवाईला सुरुवात केली. मास्क न घातल्यास दोनशे रुपये दंड केला जात आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा आणि करवाईपासूनही बचाव करावा, असं आवाहन महापौर राखी कंचर्लावार यांनी केले.
