चंद्रपूर - चंद्रपूर येथील शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात भारतीय जनता पार्टी जिल्हा बैठक संपन्न झाली. बैठकीत भाजपा नेत्यांसोबत जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील बूथ रचना, संघटनाच्या दृष्टीने तसेच येणाऱ्या निवडणुका नियोजनाबद्दल चर्चा झाली. यावेळी संबोधित करतांना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले की केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी बिलाविरोधात विरोधक आळमुठी भूमिका घेत सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, तसेच काही कथित शेतकरी नेते ज्यांना मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी आंदोलनजीवी म्हटले आहे ते या आंदोलनावरून सार्थ करत असल्याचेही सांगितले. मोदी सरकार शेतकरी प्रेमी व शेतकऱ्यांना न्याय देणारं सरकार आहे म्हणुनच हे तिन्ही कृषी विधेयक शेतकऱ्यांचे हित जोपासून, भविष्याचा विचार करून विधेयक आणले आहे. #News34Chandrapur
आंदोलनाला हरियाणा व पंजाब राज्याशिवाय अन्य कोणत्याही राज्यात प्रतिसाद मिळत नाही आहे याचे कारण हे विधेयक शेतकरी हिताचेच आहे असेही यावेळी अहीर यांनी सांगितले. मोदी सरकारच्या काळात एमएसपी करिता कार्य करून उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव सगळ्या शेतमालांना दिला तसेच खतांचा काळाबाजार थांबवून दर वाढू दिले नाही व मुबलक खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. सिंचना करिता राज्यांना फंड देऊन देशात शेतकरी संपन्न होईल या दिशेने सरकार काम करत आहे. देशात युपीए सरकारच्या कार्यकाळात भूमीअधिग्रनात शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात घेतल्या जात असतांना आता भूमिअधिग्रहण केलेल्या जमिनींना चार पट भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय दिला आहे तसेच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये देऊन शेतकऱ्यांचा सन्मान मोदी सरकारने केला म्हणूनच उत्पादन वाढले, निर्यात वाढली, भारताचे शेतीमाल मोठ्या प्रमाणात अन्य देशात विकू लागले आहे. शेती उत्पन्नावर भारत आत्मनिर्भर होत आहे अश्या सर्व सरकारच्या उपलब्धया पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनतेसमोर स्पष्ठ कराव्या असे आवाहन यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
