गणेश लोंढे / नांदा फाटा
देशाच्या जळणघडीत ग्रामीण भागातील गावांचा मोठा सहभाग राहिला आहे ग्रामीण भागातील युवक हा वेगवेगळ्या क्षेत्रातून अनेक मोठे व्यक्ती घडले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील युवक व तरूणांनी स्वतःला कमजोर न समजता आत्मविश्वासाने पुढे प्रगती करावी असे प्रतिपादन गडचांदूर पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक यांनी केले ते नांदा येथील पोलीस स्वर्गीय अमलदार वसंत तुमराम यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य व्हॅलीबाल स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते.
नांदा येथील रुद्रा स्पोर्टिंग क्लब हे दरवर्षीच व्हॉलीबॉल सामन्याची स्पर्धा घेत असतात मात्र या वर्षी सर्वांचे परिचित, मनमिळlवू स्वभाव व पोलिसांची कामगिरी बजावतांना कामात कुठलीही हयगय न करता आपले पोलिस कर्तव्य बजावत असलेले पोलीस अमलदार वसंत तुमराम यांचे मागील महिन्याभऱ्यापूर्वी अपघाती निधनात स्वर्गवासी झाल्याने परिसरातील मित्र,युवक तरुणांना आजही त्यांची आठवण चर्चेत दरम्यान होते त्यामूळे येथील युवकांनी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती रुद्रा क्लबच्या पदाधिकार्यांनी दिली.
पुढे बोलतांना नायक म्हणाले की कर्तव्य बजावतांना अनेक प्रश्नांना पोलीस कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते त्यात कुटुंबाला वेळ न देता सण उत्सव स्वतः साजरा न करता सण उत्सवात चोक बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहावे व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये हाच उद्देश कर्तव्य बजावत असतांना पोलीस कर्मचाऱ्यांचा असतो तसेही आपण सर्वांनी कोरोना काळात आपण पाहिलेच आहे की पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत संपूर्ण देश घरात असतांना पोलीस मात्र कर्तव्य बजावत रस्त्यावर उभा होता त्याकाळात सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपाययोजना त्यांनी केल्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या मात्र त्यांना कर्तव्य बजावतांना स्थानिक राजकारणी व सामाजिक कार्यकरणार्यांची साथ गरजेची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पेटकर अल्ट्राटेक ग्राम विकास अधिकारी, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले,ग्रा.प.सदस्य रत्नाकर चटप,पुरुषोत्तम निब्रड,हर्षल धाबेकर,रवी बंडीवार,रुद्रा स्पोर्टिंग क्लबचे पदाधिकारी व गावातील प्रतिष्टीत नागरिकांची उपस्थिती होती.
